नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील ओंकारेश्र्वर नगर भागात 15-16 या दिवसांच्या 36 तासात एक घरफोडून चोरट्यांनी 6 लाख 78 हजार रुपयंाच ऐवज चोरला आहे. मुदखेड शहरातून 18 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. डोरली शेत शिवारातून सौरउर्जा शक्तीची एक मोटार, 35 हजार रुपये किंमतीची चोरी झाली आहे. एक कंत्राटदाराची 2 लाख 70 हजार रुपये किंमतीची अल्युनियम केबल लहान ते बारड या भागातून चोरीला गेली आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमकारेश्र्वरनगर येथे राहणारे राजेश खंडेराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 जूनच्या दुपारी 12 ते 16 जूनच्या मध्यरात्री पर्यंतते आपले घर बंद करून कुटूंबासह एका न्यायालयीन कामासाठी औरंगाबादला गेले होते. या दरम्यान हे घर चोरट्यांनी फोडले. त्यातील 6 लाख 78 हजार रुपये किंमतीचा ऐवज ज्यात सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. तो चोरुन नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक श्री.एकनाथरावजी देवके साहेब अधिक तपास करीत आहेत.
वैभव राजेंद्र कदम यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.13 सी.पी.5906 ही 14 -15 जूनच्या रात्री कृष्णानगर मुदखेड येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 18 हजार रुपये आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार ठाकूर अधिक तपास करीत आहेत.
कंत्राटदार शशांक हरीशंकर शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लहान ते बारड जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी जमीनीखाली अंथरलेली 160 मिटर अल्युमिनियम केबल 14 जूनच्या रात्री 8 ते 16 जूनच्या मध्यरात्री 2 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. या केबलची एकूण किंमत 2 लाख 70 हजार रुपये आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बळीराम राठोड अधिक तपास करीत आहेत.
बाळासाहेब मारोतराव शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डोरली ता.हदगाव या शेत शिवारातून त्यांच्या विहिरीवर फिट केलेली सौरउर्जा शक्ती कंपनीची मोटार 35 हजार रुपये किंमतीची चोरीला गेल्याची माहिती 17 जूनच्या पहाटे 5 वाजता लक्षात आली. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार नामवाडे अधिक तपास करीत आहेत.
