नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड येथे चोरटयांनी एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यारंनी 67 हजार 37 रुपयांचा ऐवज चोरला आहे. साईबाबा कमानजवळील एका आईस्क्रीम दुकानातील नोकराने 3 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. जिल्ह्यातील 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विज वितरण कंपनीची 10 हजार रुपये किंमतीची तांब्याची व खांब असा 49 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईबाबा कमानजवळ मांगीलाल हरलाल चौधरी यांचे आईसक्रीम बनविण्याचे दुकान आहे. त्यात कॅशबॉक्समध्ये ठेवलेली 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम तसेच एम.एच.03 बी.एच.3364 ही 2 लाख रुपये किंमतीची गाडी असा 3 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून त्यांचाच नोकर पवन बागचंद जाट रा.बोर्डा जि.भिलवाडा (राजस्थान) तसेच राजेश सुखदेव जाट रा.देवली जि.भिलवडा (राजस्थान) हे पळून गेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार हे करीत आहेत.
मुदखेड येथील गजानन रामराव धडे यांची सराफा मार्केट मुदखेड येथे असलेली न्यु साईकृपा मोबाईल शॉपी चोरट्यांनी 13-14 च्या रात्री फोडली. त्यातून 6 नवीन मोबाईल व इतर साहित्य असा 67 हजार 37 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करत आहेत.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधून दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.क्यु.1664, एम.एच.25 ए.पी.9110 यांच्यासह एकूण 6 दुचाकी गाड्या ज्यांची किंमत 2 लाख 30 रुपये आहे. ह्या चोरीला गेल्या आहेत. भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वीज वितरण कंपनीची तांब्याची तार व खांब असा 49 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. किनवट येथे 10 हजार रुपयंाचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला आहे.
