नांदेड(प्रतिनिधी)-हर्षनगर येथे तिघांनी एका बालकाला मारहाण करून त्यांच्याकडून ऐवजाची लुट केली. पण आपलीच दुचाकी सोडून पळून गेले. या तिघांना विमानतळ पोलीसांनी त्वरीतच जेरबंद केल्यानंतर दरोड्यातील सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे न्यायालयाने या दरोडेखोरांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.11 जून रोजी मंदार माने या युवकाला शामनगर दवाखान्याजवळील हर्षनगर चौकात थांबवून त्याला तिघांनी मारहाण करून आणि धाक दाखवून त्याच्याजवळील एअरफोन आणि 900 रुपये रोख रक्कम लुटली. लुट करून पळून जातांना दरोडेखोरांनी आपली दुचाकी मात्र तेथेच सोडली. याबाबत दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 199/2022 मध्ये पोलीस उपनिरिक्षक बुरकुले यांनी पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस अंमलदार राठोड , बंडू कलंदर, गायकवाड, अरसुळे, नागरगोजे आणि भिसे यांच्या मदतीने शहरातील गंगाचाळ भागात राहणाऱ्या सुरज कोकरे, शुभम कोसरे, अश्र्वेस लोणे, या तिघांना घटनेला 24 तास होण्याअगोदरच गजाआड केले. त्यांच्याकडून 3 हजार रुपये किंमतीचा एअरफोन आणि 480 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. विमानतळ पोलीसांनी या गुन्ह्यात वापरलेली गाडी क्रमांक एम.एच.26 एल.9294 ही सुध्दा जप्त केली आहे. आज दि.12 जून रोजी न्यायालयाने या तिन दरोडेखोरांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड,(प्रतिनिधी)- आज मंगळवारी कोरोना विषाणूने सुनामीच आणली आहे. एकूण ४७४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ११०८ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९५.९० झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात २३.५० टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ७२.९९ टक्के रुग्ण आहे. […]
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मित्राच्या लहान भावाला पळवून नेऊन त्याचा खून करणाऱ्या दोन जणांना परभणी पोलीसांनी चोरवड ता.पालम येथून ताब्यात घेतले आहे. मारेकरी आणि मयत मुलगा यांच्या कुटूंबाचे आपसात जूने संबंध आहेत. कृषीसारथी कॉलनी वसमत रोड परभणी येथील बालक परमेश्र्वर प्रकाश बोबडे (14)याला दोन अज्ञात लोकांनी शाळेसमोरून दि.7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पळवून नेले. याबाबत नवा मोंढा […]
उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक न केल्यास देशभर आंदोलन ! – हिंदु जनजागृती समिती (प्रतिनिधी) विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणार्या ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तामिळनाडूचे द्रमुकचे […]