नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडात 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीसोबत नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अंमलदार तीन महिने आजारी रजेवर राहुन फिरत होता. हाच पोलीस अंमलदार कांही दिवसांपुर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होता. तेथे सुध्दा आपणच कागद पाठवायचा आणि आपण त्याची सेटींग करायची असा एक कारभार चालविल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
संजय बियाणी यांच्या हत्याकांडानंतर आजच्या दिवशी 11 आरोपी पोलीस कोठडीत आहेत. त्यामध्ये 9 आरोपींची पोलीस कोठडी 13 जून रोजी संपत आहे. तर दोन जणांची पोलीस कोठडी 15 जूनपर्यंत आहे. 13 जून रोजी पोलीस कोठडी संपणाऱ्या 9 आरोपींमध्ये एकाचे नाव हरदिपसिंघ उर्फ हार्डी उर्फ लक्की बबनसिंघ सपुरे (28) रा.मराठवाडा एकजुट प्रेसजवळ नांदेड हा आहे. गुन्ह्यात अटक होण्यापुर्वी हार्डीसोबत नांदेड जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अंमलदार तीन-चार महिन्यापासून कायम संपर्कात होता. याबद्दल वास्तव न्युज लाईव्हने कालच लेखणीला त्रास दिला होता. त्याबद्दल हार्डीकडे विचारणा झाली असेल, नसेल झाली तर करावी आणि एक पोलीस अंमलदार आरोपीसोबत मागील तीन ते चार महिन्यापासून का फिरत होता याची माहिती घ्यावी म्हणून काल मेहनत घेतली होती. दोन वेगवेगळे चेहरे वापरून हा पोलीस अंमलदार आपल्या इमानदारीप्रती गद्दार झाला होता का हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
आज तर नवीन खात्रीलायक माहिती अशी प्राप्त झाली आहे की, हार्डीसोबत फिरणारा पोलीस अंमलदार कांही दिवसांपुर्वीपर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होता. याबाबत माहिती सांगणाऱ्याने दिलेली माहिती अशी आहे की, अमुक नावाचा पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी अत्यंत भ्रष्टाचारी आहे आणि त्याने असे असे भ्रष्टाचार केलेले आहेत. असा अर्ज स्वत: लिहित होता आणि ते अर्ज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवत होता. त्यानंतर तो अर्ज घेवून हाच पोलीस अधिकारी संबंधीत पोलीस अंमलदाराला भेट होता आणि केलेल्या भ्रष्टाचारबद्दल सेटींग करत होता. पण हा अर्ज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या आवक रजिस्टरमध्ये नोंदणी होत होता की, नव्हता याबद्दल कांही खात्रीलायक माहिती प्राप्त झाली नाही. पण आज तरी त्या पोलीस अंमलदारांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यासमोर आपल्याच विरुध्दचा अर्ज आणून त्यात सेटींग करणाऱ्या पोलीस अंमलदाराची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी म्हणजे आपल्या कर्तव्याला फाटा देवून बेकायदेशीर आणि चुकीचे काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांवर नक्कीच जरब येईल.
