ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय पांडे साहेब आपण चुकलात हो..!

नांदेड(प्रतिनिधी)-मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विनयभंग आणि पोक्सो गुन्ह्या बाबत आपल्या आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना 6 जून रोजी दिलेल्या आदेशाचे खंडण करत महाराष्ट्र शासनाच्या बालकांचे अधिकार आयोग अध्यक्ष सुशिबेन शाह यांनी अत्यंत नाराजी पुर्ण शब्दात संजय पांडे यांना एक पत्र जारी केले असून 6 जूनचा आदेश परत घ्यावा अशी सुचना केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हा आदेश काढतांना बहुदा चुकलेच. कांही मोजक्या लोकांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी त्यांनी सर्वसामान्यांवर अन्याय केला आणि आपल्या पोलीस दलातील सुर्याजी पिसाळ वृत्तीच्या लोकांना एक मोठी संधी उपलब्ध करून दिली असेच दिसते.
मुुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दि.6 जून 2022 रोजी एक कार्यालयीन आदेश क्रमांक जारी केला. या आदेशात संपत्तीच्या कारणावरुन, पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आणि व्यक्तीगत कारणावरून पोक्सो, विनयभंगाच्या तक्रारी येतात. यात पोलीसकरते ती प्रक्रिया पुर्ण झाल्यावर कधी आरोपीला दोषमुक्त करावे लागते तर कधी न्यायालय त्यांना सोडते. यामुळे या प्रकरणातील आरोपींची नाहक बदनामी होते आणि त्यांची या समाजातील प्रतिष्ठेला धक्का बसतो. म्हणूनच विनयभंग किंवा पोक्सोची तक्रार आल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त यांची शिफारस आणि परिमंडळीय पोलीस उपायुक्ताच्या परवानगीनंतरच असे गुन्हे दाखल करावेत अशी या आदेशात सुचना आहे. सर्वोच्च न्यायालया ललिताकुमारी प्रकरणात दिलेल्या आदेशांचे पालन करून आरोपींना अटक करावी असे सांगितले होते.
या पत्रावर महाराष्ट्र राज्याच्या बालकांचे संरक्षण आयोगने 10 जून रोजीच दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांना उत्तर दिले आहे की, अत्यंत चुकीच्या पध्दतीने आपण हा आदेश काढला आहे तो परत घ्यावा. या पत्रात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अनेक कलमांचा उल्लेख केलेला आहे. तसेच पोक्सो कायद्याच्या अनेक कलमांचा उल्लेख करून त्यातून कायद्याला काय अभिप्रेत आहे. याचे स्पष्टीकरण लिहिलेले आहे. त्यानुसार आयोगाला काय अधिकार आहेत. त्या अधिकारानुसार त्यांनी कोणत्या लोकांबद्दल समाजात काम करण्याची गरज आहे हे दाखवले आहे. प्रत्येक कलमानुरूप त्याचे स्पष्टीकरण देत बालकांचे अधिकार आयोग अध्यक्ष सुशिबेन शाह यांनी या पत्रात संजय पांडे यांच्या पत्रामुळे समाजातील अनेकांना त्रास होईल असे लिहुन ते पत्र संजय पांडे यांना पाठवले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात संजय पांडे यांची ख्याती देव माणुस अशी आहे. बऱ्याच अंशी हे खेरपण आहे. परंतू पोक्सो आणि विनयभंग या गुन्ह्याचा संबंध महिलांशी जोडून आले. आता प्रत्येक तक्रारीची शहा-निशाह सहाय्यक पोलीस आयुक्त करेल आणि परिमंडळीय पोलीस उपआयुक्त त्याला परवानगी देतील यात जाणारा वेळ संजय पांडे यांनी ओळखला नाही. या परिस्थितीमध्ये ज्या महिलेवर खऱ्याच पध्दतीने विनयभंग किंवा पोक्सो सारखा गुन्हा अनुभवण्याची वेळ आली असेल त्या महिलेचे काय होईल याचा विचार संजय पांडे यांच्या आदेशात नाही. एखादा फिर्यादी पोलीस ठाण्यात आलाच तर पिएसओच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती त्याची शाह निशाह करू शकतो. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पडताळणी आणि परवानगी या दोन गोष्टी गुन्ह्याच्या नोंदणीसाठी उशीर करणाऱ्या होतील. त्यामुळे ज्या पिडीतांना न्याय देण्यासाठी पोलीस दल रात्रंदिवस राबते आहे. आपल्या दुरडीत भाकरी नसतांना, सारे गाव झोपले असतांना पोलीस जागतो या शब्दांमध्ये भरपूर काही आहे. एखाद्या तक्रारदाराने पोक्सो आणि विनयभंगाची खोटीच तक्रार दिली तर फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे त्याने खोटी तक्रार दिली असा गुन्हा पोलीसांना सुध्दा तक्रारदारावर दाखल करता येतो.उगीचच आपण संधीचे सोने करण्याची प्रवृत्तीबळावेल असा आदेश दिला आहे.
पण याच पोलीस दलात सुर्याजी पिसाळ, मिर सादीक-मिर कासीम या वृत्तीची मंडळी सुध्दा आहे.एखादी महिला पोक्सो आणि विनयभंगाची तक्रार घेवून आली तर या तीन वृत्तीच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना भरपूर मोठी संधी संजय पांडे यांनी उपलब्ध करून दिली आहे. संजय पांडे सांगतात की असे खोटे होते. याला सुध्दा आमचा आक्षेप नाही परंतू काही टक्के मंडळी असे खोटे करणारे असतील तर बहुसंख्य टक्केवारीच्या लोकांवर संजय पांडे यांचा आदेश अन्यायकारक ठरेल. बाल अधिकारांचे संरक्षण आयोगाने केलेल्या सुचनेप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आपला आदेश परत घ्यावा अशी आमची सुध्दा त्यांना विनंती आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.