नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी पोलीस मुख्यालयाचे मुख्य राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे सुट्टीवरून हजर झाले आहेत. या परिस्थितीत आता नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या नियुक्तीचे काय होईल हा प्रश्न मात्र उभाच आहे.
6 जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड ग्रामीणचे पोलीस अंमलदार शिवाजीराव गणपतराव पाटील यांना 14 हजारांची लाच घेतांना जाळ्यात पकडले. त्यांना अटक झाली. त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. शिवाजीरावज पाटीलसोबत त्यांचा एक खाजगी सेवक मारोती कवळे सुध्दा या प्रकरणात अडकला.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी इतरांना दिली तशीच पारदर्शक वागणूक पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांना दिली आणि त्यांना पोलीस मुख्यालयाचा प्रभार घेण्यास सांगितले. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला हा कार्यक्रम आहे. पण अशोक घोरबांड साहेब पोलीस मुख्यालयात कधीच हजर झाले नाहीत आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सुध्दा दिसले नाहीत अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
सर्वसामान्यपणे अशा परिस्थितीत प्रभारी अधिकाऱ्याला नियंत्रण कक्षात जमा केले जाते. या प्रकरणात थोडीशी वेगळी भुमिका घेत पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी श्री.अशोकरावजी घोरबांड यांना पोलीस मुख्यालयाचा प्रभार दिला. आज दुपार नंतर मुळ राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे हे आपली सुट्टी संपल्यानंतर हजर झाले आहेत. तेंव्हा आता पोलीस निरिक्षक घोरबांड साहेबांना कोठे पाठवले जाईल हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
संबंधित बातमी…