नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील गवळीपूरा भागात चोरट्यांनी एक घर फोडून जवळपास 18 लाख रूपये रोख रक्कम आणि 3 तोळे सोन्याची चोरी केली आहे. सोबतच भालेराव हॉस्पीटलच्या गल्लीत असलेले एक दुकान फोडून चोरट्यांनी 15 हजार रूपये चोरून नेले आहेत.
महमंद खय्युम अब्दुल गफार कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 8-9 जूनच्या रात्री गवळीपूरा भागात त्यांचे घर फोडण्यात आले. कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील 18 लाख रूपये रोख रक्कम आणि 3 तोळे सोने चोरून नेले आहे. तसेच शहरातील भालेराव हॉस्पीटल गल्ली या भागात असलेले मराठवाडा इलेक्ट्रीकल दुकानाचे शटर उचकून काही चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांच्या कॅशिअर बॉक्स तोडून चोरट्यांनी त्यातून 15 हजार रूपये चोरून नेल्याची तक्रार इंद्रजीत खेमाणी यांनी दिली आहे.