ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव फाटा येथे भिषण अपघात; ड्रायव्हर नारायण कल्याणकर यांचा जागीच मृत्यू

हिमायतनगर (प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे सरसम बू येथील नारायण कल्याणकर नावाचा एक नवतरुण गाडी ड्रायव्हर तामसा येथील एक भाडे सोडून जवळगाव मार्गे गावाकडे येत होता तेव्हा खैरगाव फाटा येथे त्यांचा ब्रेकन लागल्यामुळे भिषण अपघात झाला व त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील टिन शेड वर धडकली तेव्हा त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील मयत नारायण कल्याणकर हा कलुझर गाडी एम.एच.26 बी. क्यू. 7996 या नंबरची गाडी तामसा येथील भाडे सोडून आपल्या मूळ गावी जवळगाव मार्गे परत येत होता त्या दरम्यान खैरगाव फाट्याजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांचे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील तीन शेड वर जाऊन आदळल्याने या घटनेत झोपड्या वडील दगडे थेट गाडीत घुसून वाहनातील ड्रायव्हर च्या डोक्याला गंभीर लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला व इतर एकास किरकोळ दुखापत झाली असल्याचे उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले ही घटना दिनांक सात जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भुसणर साहेब यांनी अपघात ठिकाणचा पंचनामा करण्यासाठी पोलिस कर्मचारी पाठवले व या घटनेमुळे सरसम बु गावावर शोककळा पसरली आहे

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *