नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत राहते.आज पुन्हा एकदा आले आहे. आज तर उच्चतम पातळी गाठत एका पोलीस अंमलदाराने चक्क फोन पे अँपवर लाचेची काही रक्कम स्विकारली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक खाजगी माणूस आणि एक पोलीस असे दोन ताब्यात घेतले आहेत.लाच 21 हजारांची त्यात 14 हजार रोख घेतले आणि 7 हजार लाचेची रक्कम फोन पे या अँपवर स्विकारली.या पोलीसाच्या अंग झडतीत फक्त 2 लाख 25 हजार रुपये सापडले आहेत.
दिनांक 6 जून 2022 रोजी एक तक्रारदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री अशोकराजी घोरबांड साहेब यांचे उजवे हात असलेले पोलीस अंमलदार शिवाजी गंगाधर पाटील (35) व्यवसाय नोकरी, पोलीस शिपाई/2929, पोलीस स्टेशन, नांदेड ग्रामीण, नांदेड. रा. ह. मु. मदन पाटील यांचे घर, संकेत हॉस्टेल जवळ, ओंकारेश्वर नगर, नांदेड मूळ रा. पाथरड ता. मुदखेड जि. नांदेड. आणि खाजगी माणूस अर्थात पोलीसांचा सेवक मारुती गोविंदराव कवळे, (34) व्यवसाय शेती, रा. इळेगाव ता. उमरी जि. नांदेड हे दोघे यातील आरोपी पोलीस अंमलदार शिवाजी पाटीलने, तक्रारदार यांना त्यांचे 3 वाळूचे टिप्पर नियमितपणे चालवू देण्यासाठी व वाळूच्या टिप्परवर या पुढे कारवाई न करण्यासाठी, प्रती टिप्पर 7 रुपये प्रमाणे तीन टिप्पर चे 21 हजार प्रति महा अशी मागणी करत आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लगेच पडलाळनी केली आणि 14 हजार रुपये रोख स्विकार करताच दोघांना अटक केली.त्यापैकी 7 रुपये यापूर्वी फोन पे ॲपद्वारे स्वीकारले असून, उर्वरित 14 हजार रुपये काल दिनांक 6 जून रोजी खाजगी पोलीस सेवकच्या हाताने स्विकारली.
तपासणीत शिवाजी पाटील यांच्या अंगझडतीत फक्त 2 लाख 25 हजार एव्हडी छोटीशी रोख रक्कम पण सापडली आहे.
ही सापळा कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभाचे पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे , अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण,पोलीस उप अधिक्षक राजेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधिक्षक अशोक इप्पर, नानासाहेब कदम व पोलीस निरिक्षक जमीर नाईक, पोलीस अंमलदार एकनाथ गंगातिर, सचिन गायकवाड, मारोती मुलगिर आणि चक्रधर गजानन राऊत यांनी पूर्ण केली.या गुन्याचा पुढील तपास अशोक इप्पर हे करणार आहेत.
ही माहिती प्रसार माध्यमांकडे देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. कार्यालय दुरध्वनी – 02262 253512,राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड मोबाईल नंबर – 7350197197 ,टोल फ्रि क्रमांक 1064 वर माहिती द्यावी.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील नियमांनूसार पोलीस अंमलदार शिवाजी पाटीलचे प्रभारी अधिकारी श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांची चौकशी होणार काय ? हा प्रश्न आणि त्याचे उत्तर मात्र अवघड आहे.
आता कोण नविन मालक वाळू घाट आणि त्यांचे मालक यावर अनेकांची नजर असतेच. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील जूने मालक नामदेव ढगे यांना या मालकी कामातून मुक्ती मिळाली आहे आणि आता नविन मालक शिवाजी पाटीलने धडा गिरवला आहे.आता कोणता नविन वाळू घाटाःचा मालक बनणार हे महत्वपूर्ण असणार आहे.