नांदेड,(प्रतिनिधी)- बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या पत्नीने आपलाच दीर प्रविण बियाणी विरुध्द हिशोबाची हार्ड डिस्क चोरल्याची तक्रार दिली आहे.प्रविण बियाणी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत.
5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या झाली.त्यांच्या पत्नी अनिता संजय बियाणी यांनी आपले दीर अर्थात संजय बियाणी यांचे भाऊ , प्रवीण बलाजीप्रसाद बियाणी यांनी अनिता बियाणीच्या मालकीचे राज मॉल येथील फायनान्स ऑफिस मधून तोशिबा कंपनीची 1टीबी क्षमतेचा संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती असलेला हार्ड डिस्क चोरून घेऊन नेला आहे. या ताक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 195/2022 कलम 43 ब 66 तंत्रज्ञान कायदा आणि 380 भारतीय दंड संहीता प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या बाबतचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे हे करणार आहेत.
याप्रकणातील संशयित आरोपी प्रवीण बियाणी हे गुन्हा दाखल होण्या अगोदर पासून छातीत दुखत असले कारणाने विवेकानंद हॉस्पीटल येथे उपचार घेत आहेत. विमानतळ पोलीसांनी दवाखान्यात पोलिस गार्ड लावला आहे.