नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन युवकांना पकडून एकाकडून धार-धार हत्यार आणि एकाकडून एअर गन असे हत्यार पकडले आहेत. या दोघांविरुध्द भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 जून रोजी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला प्रथम पावडे वाईन्स या दुकानासमोर पाठवले. तेथून त्यांनी शशिकांत मुकूंद वाकडे (20) रा.राजेशनगर यास पकडले. त्याच्याकडे गुप्तीसारखे हत्यार होते.
दुसऱ्या एका घटनेत पोलीसांनी जुन्या फायरस्टेशनजवळून सुरेश माधवराव बर्ने (18) यास पकडले. त्याच्याकडे एअर गण हे हत्यार होते. दोघांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी ही कार्यवाही करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, रवि बामणे, दिलीप राठोड, देवसिंघ सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
