नांदेड शहरात एक लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. नांदेड शहरातील विमानतळ, वजिराबाद, शिवाजीनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
रविंद्रकुमार दामोधरराव बेंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 जूनच्या रात्री 1 ते पहाटे 4 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या किचन रुमचा कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 2 लाख 92 हजारांचा ऐवज चोरला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.
नाजिया शेख सय्यद अब्रार अली यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.क्यु.2261 ही 31 मेच्या रात्री 7.30 वाजता युनिक हॉस्टेल पिरनगर समोरून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 40 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
दि.23 मे रोजी सायंकाळी 7.30 ते 8.30 या वेळेदरम्यान गुरू मेडिकल डॉक्टर लेनसमोरुन प्रल्हाद विनायकराव जकाते यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एक्स3384 ही 25 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सोनटक्के अधिक तपास करीत आहेत.
अनिल प्रकाशराव शेळके यांची दुचाकी गाडी 35 हजार रुपये किंमतीची 2 जून रोजी सायंकाळी 5 ते 6 या एका तासाच्या वेळेत चोरीला गेली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार घुगे अधिक तपास करीत आहेत.
