नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात आज 2 मे रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी इंबिसात देशमुख यांनी 10 जून 2022 पर्यंत इतर सहा जणांसोबत एकाला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संजय बियाणी हत्याकांड उघड केल्याची माहिती काल दि.1 जून रोजी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी प्रसार माध्यमांसमोर उघड केली. काल सहा जणांना न्यायालयात 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेवून आम्ही लवकरात लवकर या प्रकरणाचे सर्व गुन्हेगार गजाआड करू असे सांगितले होते.
आपल्या शब्दानुसार पोलीसांनी काल दि.1 जून 2022 रोजी मध्यरात्रीच्या थोडे अगोदर हरदिपसिंघ उर्फ हार्डी, लक्की बबनसिंघ सपुरे (28) रा.मराठवाडा एकजुट प्रेसजवळ, गणपतनिवास यास अटक केली. पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी हरदिपसिंघ उर्फ हार्डीला आज न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.मुधोळकर यांनी या प्रकरणातील इतर सहा आरोपी 10 जून पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. याप्रकरणातील भरपूर मुद्दे न्यायालयासमक्ष सादर करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश देशमुख यांनी हरदीपसिंघ उर्फ हार्डीला इतर सहा जणांसोबत 10 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी..