नांदेड(प्रतिनिधी)-शेतीच्या वादातून एका 70 वर्षीय व्यक्तीचा डोक्यात विट घालून खून करण्यात आल्याचा प्रकार मौजे आरळी ता.बिलोली येथे घडला आहे.
मारोती लक्ष्मण बोडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.31 मेच्या रात्री 10 वाजता आरळी गावात नागनाथ चंदावार यांच्या घरासमोर संभाजी हणमंत बोडके (70) यांना शेतीच्या वादाचा नवीन वाद काढून उमाकांत रामराव बोडके याने संभाजी बोडकेच्या डोक्या वीट टाकून त्याचे डोके फोडले आणि त्याचा खून केला. या प्रकरणी बिलोली पोलीसांनी गुन्हा क्रमांक 131/2022 दाखल केला. प्रभारी पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात अत्यंत जलदगतीने मेहनत करून या प्रकरणातील मारेकरी उमाकांत रामराव बोडके (25) यास अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत.