नांदेड,(प्रतिनिधी)-दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी समर्थ रामदासांचे जन्मगाव असलेल्या जांब(समर्थ) ता. घनसांगवी जि. जालना येथे श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन केले आहे. गंगा दशहरा या पावन पर्वानिमित्त दिनांक 4 जून 22 ते 12 जून 22 या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या या उत्सवात नामवंत किर्तनकार,प्रवचनकार व गायक यांचा सहभाग राहणार आहे. तसेच ग्रंथराज श्रीमत् दासबोध या ग्रंथाचे पारायण होणार आहे.तसेच दासबोध अभ्यास वर्ग व श्री समर्थ संप्रदाय उपासना इ कार्यक्रमाचा समावेश असेल.2003 पासून सतत संपन्न होणाऱ्या या उत्सवात अनेक समर्थ वाढता सहभाग लक्षणीय आहे. मागील 20 वर्षांपासून यशस्वीपणे आयोजन होत असल्याबद्दल आयोजक गिरीश वसंतराव सातोनकर,संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी आनंद व्यक्त केला. दोन वर्षापासून कोविड च्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष स्वरूपात सहभाग न नोंदविता न आल्यामुळे यावर्षी उपस्थिती लक्षणीय राहण्याची शक्यता आहे. तरी भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक,तबलावादक, तालदास गिरीश सातोनकर यांनी सर्वांना केले आहे.
