नांदेड(प्रतिनिधी)-आज नांदेड जिल्हा पोलीस दलातून दोन पोलीस निरिक्षक, दोन पोलीस उपनिरिक्षक, पाच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि सहा पोलीस अंमलदार अशा 15 पोलीसांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांना निरोप देतांना अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आणि गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी सेवानिवृत्तीचा निरोप देतांना भावी जीवनासाठी शुभकामना दिल्या.
नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस निरिक्षक भगवान भिमराव कांबळे- पोलीस ठाणे विमानतळ, अशोक भिमराव कोलते-महिला सहाय्यक कक्ष, पोलीस उपनिरिक्षक प्रकाश शामराव कुंभारे-पोलीस ठाणे मुखेड, उत्तम शंकरराव वरपडे पाटील-पोलीस ठाणे वजिराबाद, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गंगाधर गणपतराव जाधव-शहर वाहतूक शाखा, गोविंद नारायण पानपट्टे- पोलीस ठाणे अर्धापूर, राजलिंग मल्लीकार्जुन सातारे- पोलीस ठाणे कंधार, सिध्दार्थ हिरामन जोंधळे-पोलीस ठाणे तामसा, भारत नागोराव दरडे-पोलीस ठाणे सिंदखेड,पोलीस अंमलदार पांडूरंग गोविंदराव यन्नावार- पोलीस ठाणे बिलोली, राजेंद्र इरन्ना पांचाळ- पोलीस ठाणे देगलूर, गोपाळ पंढरीनाथ सानप-हत्यार शाखा, संभाजी शेषराव सदावर्ते, शोकत हुसेन शाहेद हुसेन-पोलीस मुख्यालय आणि विजय राजाभाऊ पाटील-बिनतारी संदेश असे एकूण 15 अधिकारी आणि पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना सन्मानपुर्वक त्यांचा कौटूंबासह सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांना सर्व सेवानिवृत्त पोलीसांना भविष्यातील जीवनासाठी शुभकामना दिल्या. या कार्यक्रमात जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, कमल शिंदे यांच्यासह नियंत्रण कक्षातील अनेक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मानन्याची जबाबदारी पोलीस अंमलदार रुपा कानगुले यांनी पार पाडली.
