नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सातेगाव ता.नायगाव येथे महादेव मंदिरात एक नंदीदिप आणि इतर साहित्य चोरट्यांनी चोरले आहेत.
प्रकाश व्यंकटराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सातेगाव महादेव मंदिरात 28 मे च्या मध्यरात्री चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. मंदिरातील एक नंदादिप, एलईडी लाईट बल्प असा 5 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. कुंटूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कुमरे अधिक तपास करीत आहेत.
भाग्यनगर जवळी टेलीफोन भवनसमोरून माधव पुंडलिक गायकवाड यांचा 25 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. तसेच रेल्वे स्टेशन भोकर आणि बेंबर शिवारातून तांब्याचे वायर किंमत 63 हजार 122 रुपयांचे चोरीला गेले आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
