ताज्या बातम्या नांदेड

पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी केली पोलीस उपनिरिक्षक आणि पोलीस अंमलदाराची केली प्रशंसा

दोघांनी मृत्यूच्या पाऊल वाटेवर चालणाऱ्या युवकाची वाट बदलली
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे आणि पोलीस अंमलदार संतोष बनसोडे यांनी एका युवकाला आत्महत्येपासून कालच परावृत्त केले. या घटनेला प्रसार माध्यमांनी जागा दिली. वास्तव न्युज लाईव्हने राज्यभरातील पोलीसांनी दखल घ्यावी असा प्रसंग या मथळ्याखाली प्रसिध्दी दिली होती. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी आपल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदराचा अत्यंत त्वरीत प्रभावाने सन्मान करून दखल कशी घ्यायची असते. हे दाखवून दिले.
29 मेच्या पहाटे 4 वाजता वजिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे आणि त्यांचे सहकारी चालक पोलीस अंमलदार संतोष बनसोडे हे गस्त करत असतांना नांदेडच्या बसस्थानकावर एक 21 वर्षीय युवक त्यांनी शोधला. त्याच्या वागण्यात त्यांना भरपूर कांही शंका आल्या. ऍनरॉईड फोनवर येणाऱ्या बोगस व्हिडीओ कॉलमध्ये अडकलेला हा युवक पुढे खंडणीखोरांच्या खड्‌ड्यात अडकला. आपल्या आईला न विचारता गुपचूपपणे आईच्या बॅंक खात्यातील 30 हजार रुपये त्यांने खंडणीखोरांना ऑनलाईन हस्तांतरीत केले होते. आता माझे कांही खरे नाही या वयमनस्य अवस्थेत तो घर सोडून नांदेडला आला आणि चार दिवसापासून बसस्थानकात राहत होता. हळूहळू तो मृत्यूकडे ओढला जात होता आणि तेवढ्यात पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे आणि संतोष बनसोडे त्याला सापडले आणि या दोन पोलीसांनी त्याच्यावरील मृत्यूचे सावट समुपदेशनाने दुर केले.
या वृत्ताला वास्तव न्युज लाईव्हने 29 मेच्या पहाटेच प्रसिध्द केले होते. त्यानंतर इतर प्रसार माध्यमांनी सुध्दा या घटनेची दखल घेतली आणि जागा दिली. या सर्व घटनाक्रमाची दखल पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी घेतली आणि आज दि.30 मे रोजी पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार संतोष बनसोडे यांना आपल्या कार्यालयात बोलावले. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी आपण केलेले कार्य हे पोलीस विभागाला प्रोत्साहन देणारे आहे. आपली कसोटी व कर्तव्य पाहता आपल्या उत्कृष्ट कार्याची आम्ही प्रशंसा करून अभिनंदन करीत आहोत. सोबतच भविष्यातील पोलीस जीवनात आपण असेच उत्कृष्टपणे कर्तव्यबजावत अशाच प्रकारचे कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पोलीसांनीवर नेहमीच कटाक्ष करतांना प्रसार माध्यमांकडून अतिरेक होतो अशी ओरड काही पोलीस करत असतात.पण प्रसारमाध्यमांनी प्रविण आगलावे आणि संतोष बनसोडे यांनी केलेल्या कार्याची दखल उत्कृष्ट आणि दमदार शब्दात मांडून प्रसार माध्यमांविरुध्द बोलणाऱ्यांना ओठावर बोट ठेवण्याची वेळ आणली आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी आपल्या अधिकारी आणि पोलीस अंमलदारांची मी नेहमीच दखल घेतो हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. मागील वर्षाच्या भर पावसात एक पोलीस अंमलदार आपल्याला पावसामुळे त्रास होईल याचा विचार न करता करत असलेल्या वाहतुक नियोजनाची सुध्दा निसार तांबोळी यांनी दखल घेतली होती.

संबंधीत बातमी…

राज्यभरातील पोलीसांनी दखल घ्यावी असा प्रसंग ; मृत्यूकडे ओढल्या जाणाऱ्या युवकाचे प्राण वाचवले

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *