ताज्या बातम्या नांदेड

स्वातंत्र्यवीर सावरकरांना पोलीस अधिक्षक कार्यालयात अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सव दिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत सर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
आज 28 मे 2022 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महापुरूष विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मोत्सव दिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, नियंत्रण कक्षातील कमल शिंदे यांच्यासह सर्वच शाखांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार हजर होते. सर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकारांना पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *