नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड यांना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने शेवटची संधी म्हणून 8 जून 2022 रोजी प्राधिकरणासमक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. या प्राधिकरणाचे प्रमुख उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती श्रीहरी डावरे हे आहेत. या प्रकरणात तक्रारदार ऍड.अनुप अगाशे यांना सुध्दा प्राधिकरणासमोर हजर राहण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे.
नांदेड येथील ऍड.अनुप श्रीराम अगाशे यांनी त्यांच्यासोबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेल्या वर्तवणूकीबद्दल राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे अर्ज ईमेल अर्ज केला होता. या प्रकरणी झालेल्या मागील सुनावणीमध्ये तक्रारदार अनुप अगाशे हजर नव्हते. पण पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड हजर होते. या संदर्भाने श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांनी आपले म्हणणे व्यक्तीश: सादर केले. परंतू प्राधिकरणासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली नाही. त्या दिवशी, मागील तारखेच्या दिवशी तक्रारदार ऍड. अनुप अगाशे हजर नव्हते. यावर आदेश करतांना न्यायमुर्ती श्रीहरी डावरे यांनी या प्रकरणाची अंतिम सुनावणी 8 जून 2022 रोजी सुनिश्चित केली आहे. या दिवशी श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब, पोलीस निरिक्षक सुनिल निकाळजे व इतरांना हजर राहण्यास सांगितले आहे. तक्रारदार ऍड.अनुप अगाशे यांना सुध्दा 8 जून 2022 रोजी प्राधिकरणाच्या समक्ष हजर राहण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. जर गैरहजर राहिले तर तक्रारीचा अंतिम निकाल दिला जाईल असे या आदेश लिहिले आहे.