नवीन नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य डॉं देवानंद जाजु यांची दि 25 रोजी राञी राहात्या घरी झोपीच्या गोळ्या प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली . या प्रकरणी ग्रामिण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . आत्महत्या की ह्रदयविकार परिसरात चर्चा.
नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका डॉं सुरेखा जाजु याचे पती तथा भाजपाचे सक्रिय सदस्य म्हणुन परिसरात परिचय असलेले डॉं देवानंद जाजु हे गेल्या अनेक वर्षापासुन सिडको परिसरात जाजु रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत होते . अलीकडच्या काळात त्याच्या पत्नी व मुलीच्या शिक्षणासाठी मुंबई येथे वास्तव्यास आहे . ते एकटेच जाजु रुग्णालयातून रुग्णसेवा देत होते . मनमिळावू स्वभावाने व रुग्णसेवेत त्यांचा परिसराला परिचय होता . दि 24 रोजी परिसरातील एका कुंटुंबीक कार्यक्रमात हजेरी लावुन ते घरी आले होते . सकाळी नेहमी प्रमाणे रुग्णालयच्या शेजारी असलेल्या मेडीकल स्टोअर्सने त्यांना फोन केला परंतु ते फोन उचल नसल्याने त्यांनी समोर असलेल्या पोलिस चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांना हि परिस्थिती सांगितल्यानंतर पोलिस व नागरिकांनी रुग्णालयाचा दरवाजा तोंडुन आत प्रवेश केला असता ते रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ते पलंगावर मृत अवस्थेत दिसुन आले . त्याच्या जवळ असलेल्या टेबल वर झोपीच्या गोळ्याचे पॉंकीट आढळुन आले . त्यावरुन ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लक्ष्मण राख यांनी प्राथमिक आंदाजावरुन त्यांनी झोपीच्या गोळ्या घेवुन आत्महत्या केल्याची माहिती दिली . त्यानंतर परिसरातील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या मिञांनी पहाणी केली असता त्याचा मृत्यु ह्रदयविकाराने झाला असावा असा अंदाज व्यक्त केला असला तरी ग्रामिण पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली . मृतदेह उत्तरतपासणीसाठी विष्णुुपुरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले . त्याचे कुंटुंबीय आल्यानंतरच त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे . त्याच्या पश्चात पत्नी , दोन मुली असा परिवार आहे .