नांदेड(प्रतिनिधी)-कहाळा येथे राजस्थान रॉल्स आणि गुजराथ टायटन्स या क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवणाऱ्या एका युवकाला कुंटूर पोलीसांनी पकडले आहे.
कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव पुरी यांना मिळालेल्या माहितीनुसार कहाळा गावात क्रिकेट सामन्यावर जुगार/ सट्टा सुरू असल्याची त्यांना मिळाली. सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दिनेश येवले, पोलीस अंमलदार निखाते, मोहन कंधारे, अशोक घुमे यांना कहाळा येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी शेख करीमोद्दीन उर्फ निसार शेख हुसेन (24) रा.कहाळा यास पकडले. त्या ठिकाणी एक लॅपटॉप संगणक, तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा 56 हजार 250 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. शेख करीमोद्दीन उर्फ निसार विरुध्द पोलीस उपनिरिक्षक दिनेश येवले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 90/2022 महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 आणि 5 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक संजय अटकोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी कुंटूर पेालीसांचे कौतुक केले आहे.
