नांदेड(प्रतिनिधी)-पदोन्नती देतांना पदसंख्या आणि पदोन्नतीच्या संवर्गातील पदसंख्या यांचे योग्य गुणोत्तर राखण्यासाठी लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देतांना गट -क वर्गातील पदोन्नतीचे स्तर कमी करण्यासाठी शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकावर सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गिता कुलकर्णी यांची स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय विभागातील लिपीक या गट- क मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी एक अभ्यास समिती स्थापन केली होती. त्यामध्ये लेखा व कोषागारे वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव अध्यक्ष होते. भारतीय प्रशासनिक सेवेतील उपसचिव सदस्य होते आणि वित्त विभागातील उपसचिव या समितीचे सदस्य सचिव होते. या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.
सर्वच प्रशासकीय विभागांमध्ये लिपीक संवर्गाचे पदनाम सारखे करून सर्वस्तरावरील पद नामाची रचना एकसारखी करणे, एकसारखी पदोन्नती साखळी व वेतन संरचना विहित करणे शक्य होणार नाही पण संवर्ग व्यवस्थापनाच्या दृष्टीने तसेच पदोन्नतीच्या उचित संधी मिळण्याच्या दृष्टीने संबंधीत प्रशासकीय विभागांनी त्यांची कामकाजाची मनुष्यबळाची आणि प्रशासकीय संरचनेची गरज विचारात घेवून स्वतंत्र पणे अभ्यासाअंती व सामान्य प्रशासन विभागासोबत विचारविनियम करून गट क मधील संवर्ग संख्या / पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाब या समितीने शिफारस केली.
त्या अनुशंगाने संवर्गाची संख्या कमी करतांना त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर आणि नागरीकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांवर प्रतिकुल परिणाम देणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रशासकीय कामकाज आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज विचारत घेण्यात यावी. संवर्गातील संख्या कमी करतांना दोन संवर्गांचे विलीनीकरण क रण्याची गरज भासू शकते. अशा प्रकरणी रिक्तपदे निरसीत करून आर्थिक भार मर्यादेत ठेवण्याबाबत विचार करावा. संवर्ग संख्या, पदोन्नतीचे स्तर कमी झाल्यामुळे दैनंदिन कामे तसेच कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे. संबंधीत आस्थापनेचा पिरॅमीड योग्य राहिल याची काळजी घेण्यात यावी. पदसंख्या आणि पदोन्नतीच्या संवर्गातील पदसंख्या याचे गुणोत्तर योग्य राखण्यात यावे.
सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या आधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील गट-क मधील कार्यरत असणाऱ्या सर्व संवर्गांचा आढावा घेवून त्यापैकी कांही संवर्ग कमी करण्याचा विचार करावा. त्यामुळेच गट क मधील पदोन्नतीचे स्तर कमी होती. याबाबतचा आढावा 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पुर्ण करून सुयोग्य प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे या शासन परिपत्रकात नमुद आहे. शासनाने हे परिपत्रक संगणक संकेतांक 202205231745421607 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
