नांदेड, ( प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाच्या नांदेड जिल्हा चर्मकार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन आसोरे यांची निवड करण्यात आली आहे.
नियुक्तीपत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.डॉ.रामदास आठवले यांंच्याहस्ते व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहामध्ये प्रदान करण्यात करण्यात आले.
यावेळी मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष बालाजी धनसरे, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष गौतम काळे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे,संजय भालेराव,प्रतिक सोनवणे,बळीराम आसोरे,शुभम मादसवार,रामा चिंतोरे आदी उपस्थित होते.