नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाची कार्यकारणी महाराष्ट्राचे सचिव डॉ.एम.जे.कादरी यांनी नियुक्त केली आहे. या पत्रावर संयोजक प्रा.देविदासराव शिंदे यांची स्वाक्षरी पण आहे.
आम आदमी पार्टी(आप) या राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्षाचा प्रचार व प्रसार करणे, पक्षाचे संघटन मजबुत करणे, वार्ड शाखा तयार करणे, सामाजिक न्यायासाठी धरणे आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देणे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करणे या जबाबदारीसह नांदेड शहरातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
नांदेड शहरात दोन उपाध्यक्ष ऍड.सुमंत दिनकरराव लाठकर आणि डॉ.गौतम भिमराव कापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड शहरात सोशल मिडीया प्रमुख पदी ऍड. शिलवंत विजय शिवभक्त यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सोशल मिडीया उपाध्यक्षपदी ऍड.विशाल संजय गच्चे यांची नियुक्ती झाली आहे. नांदेड उत्तर प्रभाग प्रमुख या पदावर अजय एकनाथराव सूर्यवंशी यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
