नांदेड(प्रतिनिधी)-उस्मानगर जवळी उदासी चौकात आठ दिवसात दुसऱ्यांदा धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार घडला. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आज दिवसभर तेथेच होते. रस्ता रोको झाला असतांना त्यातून मार्ग काढण्यात आला आणि आठ दिवसात दुसरा गुन्हा अज्ञात आरोपींविरुध्द दाखल करण्यात आला.
8 मे रोजी उस्माननगरजवळील उदासी चौकात एक पोस्टर फाडून धार्मिक भावना दुखावल्याची घटना घडली होती. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकत्ते यांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला होता. काल दि.16 मे रोजी असाच प्रकार तेथे घडला आणि धार्मिक भावना दुखावलेल्या लोकांनी रस्त्यावर अडथळे टाकून रस्ता बंद केला. घटनेची माहिती मिळताच अपर पेालीस अधिक्षक निलेश मोरे, उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकते घटनास्थळी दाखल झाले. जनेतील मंडळी रस्त्यावर बसली होती. दोन्ही बाजूने गाड्या उभ्या होत्या. अशा परिस्थितीत पोलीसांनी जनतेसोबत संवाद साधून घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आणि अखेर पोलीसांच्या मध्यस्थितीने रस्ता रोकोचा प्रकार थांबला.
शिवप्रसाद जगन्नाथ साखरे यांच्या तक्रारीवरुन उस्माननगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 295 नुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा क्रमंाक 96/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी अज्ञात आहेत. या गुन्ह्याचा तपास उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकते हे करीत आहेत.