नांदेड(प्रतिनिधी)-हस्सापूर येथे श्री ह.भ.प.सुरेश महाराज पांढरगावकर यांनी आपल्या अमृतमय वाणीतून भगवत भक्तीची रोपे पेरली. दि.15 मे रोजी या अखंड हरिनाम सप्ताहची सुरूवात झाली.
श्री ह.भ.प.सुरेश महाराज पांढरगावकर यांच्या अत्यंत रसाळ वाणीतून हरीणे माझे हरीले चित्त या अभंगाद्वारे सामाजिक, धार्मिक अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रबोधन मांडले. गो-पालन, माता-पित्याची सेवा आणि वृक्षारोपणातून भगवत भक्ती या विषयी मार्गदर्शन करतांना आजच्या जीवनातील गरजा या अद्यात्माशी कशा जोडल्या आहेत. याचे विवेचन केले. सकाळी 10 वाजेदरम्यान गावातील प्रमुख रस्त्यावरून गं्रथदिंडी काढण्यात आली. त्यात बालक-बालिकांसह अबालवृध्द सर्वच जण सहभागी झाले होते. दुपारी 12 वाजता श्री ह.भ.प.सुरेश महाराज पांढरगावकर यांच्या किर्तनानंतर पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपला. काल्याच्या किर्तनात नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हस्सापूर गावातील गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले.
