ताज्या बातम्या नांदेड

सूनबाईवर लैंगिक अत्याचार करणारा सासरा पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या सासऱ्याने आपल्यावर शारिरीक अत्याचार केल्याची तक्रार एका सुनबाईने दिल्यानंतर त्या 57 वर्षीय सासऱ्याला अटक केली. आज 16 मे रोजी दुसऱ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम यांनी सुनबाईवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला 18 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
9 मे रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 172/2022 मध्ये पोलीस उपनिरिक्षक एन.व्ही. जाधव यांनी परभणी येथील सोमनाथ माणिकराव शेट्टे (57) यास अटक केली. सोमनाथ शेट्टे यांच्या सुनबाईने दिलेल्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 376(2)(एन), 498(अ), 323, 504, 506 आणि 34 ही कलमे जोडण्यात आली आहेत. सुनबाईच्या म्हणण्यानुसार तिचे लग्न सुजित सोमनाथ शेट्टेसोबत झाले. 15 लाख रुपये खर्च आणि सोन्याचे दागिणे अशी रक्कम लग्नात देण्यात आली होती.
माझे पती सुजीत सोमनाथ शेट्टे बाहेरगावी गेल्यानंतर साधारणता: ऑक्टोबर 2021 मध्ये सासु-सासरे आणि मी असे तिघेच घरी असतांना सासऱ्याने माझ्यावर अत्याचार करतांना माझ्या मुलाकडून कांही होणार नाही, तुला माझ्यासोबत संबंध ठेवूनच तुला मुल करून घ्यावे लागेल असे सांगत बळजबरी संभोग केला. ही घटना सुनबाईने सासूला सांगितली. तेंव्हा तीनेही आपले पती, सूनबाईचे सासरे यांचीच बाजू घेत तसे करणे योग्य असल्याचे सांगितले. या प्रकरणाला सामोपचाराने मिटविण्यासाठी भरपूर बैठका झाल्या. आपल्यावर झालेला अत्याचार सूनबाईने आपल्या वडीलांना सांगितला त्यानंतर अनेक लोकांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. त्यानंतर सुनबाईने विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. आजपर्यंत या युवतीच्या विवाहाला एक वर्ष सुध्दा पुर्ण झालेल ेनाही.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक एन.व्ही. जाधव यांच्याकडे देण्यात आला. एन.व्ही. जाधव यांनी आज आपले पोलीस अंमलदार, रामदास सुर्यवंशी यांच्यासोबत पकडलेला सासरा सोमनाथ माणिकराव शेट्टे यास न्यायालयात हजर केले. इतर दोन आरोपींना पकडणे आहे आणि गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे असा मुद्दा सरकारी वकील व्ही.बी. तोटेवाड यांनी मांडला. न्या.रुहिना अंजुम यांनी आपल्या सूनबाईवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्याला दोन दिवस अर्थात 18 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.