नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-लातूर रस्त्यावर एका घरात दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या लोकांना चाकूचा धाक दाखवून १ लाख ६० रुपयांची लुट केल्याचा प्रकार १६ मे रोजीच्या रात्री १.३० वाजता घडला.
सोनखेड येथील नूर नगर भागात नांदेड-लातूर रस्त्यावर घरात गरमीचा उकाडा लक्षात घेवून अब्दुल वहिब अब्दुल महीम हे आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवून सर्व कुटूंब झोपी गेले. १६ मे च्या मध्यरात्री १.३० वाजेच्यासुमारास तीन चोरटे त्यांच्या घरात आले. बॅटरीचा उजेड त्यांच्या तोंडावर दाखवून चाकुच्या धाकावर त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम १५ हजार रुपये असा एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. सोनखेड पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२, ४५७, ३८०, ३४ नुसार गुन्हा क्रमांक ८०/२०२२ दाखल केला आहे. हा जबरी चोरीचा घटनाक्रम तीन दरोडेखोरांनी अंमलात आणला आहे. गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, श्वास पथक, ठसे तज्ञ, सायबर सेलचे पथक घटनास्थळी गेले हेाते. सोनखेडचे सहाय्यक पेालीस निरिक्षक विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक चंदसिंह परिहार अधिक तपास करीत आहेत.