नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून त्याच्याकडील दीड तोळ्याची सोन्याची चैन आणि ११ हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून पळकाढला आहे. चोरट्यांनी लुट करतांना मारहाण केलेली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे चकमकीसाठी प्रसिध्द असलेले पोलीस निरिक्षक, मागील एका वर्षापासून जास्त वेळ तोंडी आदेशाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले माननिय श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या हद्दीत चोरट्यांनी कौठा पुलाजवळील सखाराम काळे यांच्या आखाड्यावर हा जबरी चोरीचा प्रकार केला. या आखाड्यावरील इरबाजी काळे यांना तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. तलवारीने झालेल्या जखमा दुरूस्त करतांना १४ टाके इरबाजी काळे यांना लागले आहेत. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणीचा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती. जबरी चोरी करणार्या चोरट्यांना बहुदा अशोकरावजी घोरबांड यांची ख्याती पुर्णपणे माहित नसेल म्हणूनच दरोडेखोरांनी हा प्रकार घडविला असा असा अंदाज व्यक्त होत आहे.