नांदेड (प्रतिनिधी)- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
शनिवार 14 मे 2022 मुंबई येथुन विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 9.30 वा. आगमन. सकाळी 10 वा. तरोडानाका नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था व इतर विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक. स्थळ- पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांचे कार्यालय सिडको रोड नांदेड. सायं. 5.30 वा. पद्मश्री इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर नांदेड या संस्थेच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- सामाजिक न्याय भवनच्या बाजुस, नमस्कार चौक, म्हाळजा बायपास नांदेड. सायं. 6.30 वा. कमलकिशोर कदम अमृत महोत्सव स्वागत समिती नांदेड आयोजित महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमकिशोर कदम यांचा अमृत महोत्सव सोहळा. स्थळ- माधसवाड इस्टेट, नमस्कार चौक, म्हाळसा बायपास नांदेड. रात्री नांदेड येथे मुक्काम.
रविवार 15 मे 2022 रोजी सकाळी 9 वा. हरिहरराव वि.भोसीकर यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ- शिवकृपा, शाहूनगर विद्युतनगर बस स्टॉप समोर आनंदनगर रोड नांदेड. सकाळी 9.30 वा. मोटारीने शाहुनगर, आनंदनगर रोड नांदेड येथून श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड कडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सकाळी 10 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथुन मुंबईकडे प्रयाण करतील.