पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांची जबरदस्त कामगिरी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत विष्णुपूरी येथील ग्रामीण तंत्रनिकेतन येथील विविध विद्यार्थ्यांना स्तत:ची ओळख लपवून, शिक्षीकांना आणि शिक्षकांना विविध संकेतस्थळावरुन संदेश पाठविणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला नांदेड ग्रामीणचे अत्यंत तडफदार पण मागील एक वर्षापासून तोंडी आदेशावर कार्यरत असलेलेले पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी अटक केली आहे.
विष्णुपूरी येथील ग्रामीण तंत्रनिकेतनचे फेरोज खान शुकूर खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किरण दत्ता जाधव रा.नांदगाव तांडा ता.किनवट जि.नांदेड आणि अविनाश बालाजी खांडरे रा.राजकॉर्नर नांदेड या दोघांनी मिळून आपली मुळ ओळख लपवून ठेवली आणि 1 डिसेंबर 2021 ते 10 एप्रिल 2022 दरम्यान ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपूरी येथील सिस्टम जनरेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमाने अश्लिल शिवीगाळ, अश्लिल फोटो असे बेकायेदशीर साहित्य ग्रामीण तंत्रनिकेतनमधील अनेक शिक्षक, अनेक शिक्षीका, अनेक विद्यार्थी, अनेक विद्यार्थींनी यांना पाठवले. नांदेड ग्रज्ञामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 280/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 504, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(सी) आणि 67 नुसार 11 मे रोजी 23.22 वाजता नोंद क्रमांक 31 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हेगारांचे कर्दनकाळ पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्याकडे आहे. गुन्हा दाखल होताच अत्यंत जलदगतीने दोन आरोपींपैकी एकाला श्रीमान अशोकरावजी घोरबांड साहेबांनी अटक केली आहे.
