ताज्या बातम्या नांदेड

लोकांच्या घरांना पाणी देत नाहीत आणि महोत्सव साजरा करता-अब्दुल सत्तार

नांदेड(प्रतिनिधी)महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत अर्थसंकल्पावर सुचना करण्याऐवजी कॉंगे्रस नगरसेवकांनी भरपूर मोठ-मोठे आहेर महापौरांच्या उपस्थितीत बोलून दाखवले. वृत्तलिहिपर्यंत अर्थसंकल्पीय सभा संपली होती की, नाही किंवा अर्थसंकल्पावर काय चर्चा झाली हे कळले नाही. सर्वात आर्कषक वाक्य माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी म्हटले की, लोकांच्या घरात पाणी देत नाहीत आणि मनपाचा महोत्सव साजरा करतात.

आज महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी महापौर जयश्री पावडे यांच्या अध्यक्षतेत सुरू झाली. व्यासपीठावर उपमहापौर अब्दुल गफार, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने आणि नगरसचिव संधू यांच्या उपस्थितीत सुरू झाली. सर्वप्रथम माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी नगरसेवकांच्या सुचनांची अंमलबजावणी होत नाही. मग आम्ही जेवायला येतोत काय असा प्रश्‍न उपस्थित केला. सोबतच मनपाच्या शाळा बंद करा आणि घरांना पाणी देता येत नाही आणि मनपा महोत्सव साजरा करते याचे दुःख व्यक्त केले. नगरसेवक शेरअली यांनी पाणी पुरवठा सुरळीत करा असे सांगितले. बीयोटी तत्वावर जागा देवून त्यात भ्रष्टाचार झाला असा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक शेख फारूख यांनी केला. यावेळी मनपा आयुक्त सुनिल लहाने म्हणाले अर्थसंकल्पीय बैठक आहे सुचना मांडा. महापौर जयश्री पावडे यांनी नगरसेवकाचा अपमान हा महापौरांचा अपमान आहे असे सांगितले. बापूराव गजभारे यांनी वरुन आदेश झाला तो आदेश देणारा कोण असे विचारले. यावर नगरसेविका नेरलकर यांनी निषेध व्यक्त केला. अशोक चव्हाणांच्या निधीवर मनपा जगते. मनपा स्वयंभू व्हावी असे बालाजी जाधव म्हणाले. पुस्तक चुकीचे व बोगस असल्याचे दिपक रावत म्हणाले. बांधकाम संचिका आडवल्याचा आरोप उमेश चव्हाण यांनी केला. आस्थापनेवरील खर्च कमी करा, विष्णुपूरी प्रकल्पातील गाळ काढा असे सांगण्यात आले. वार्डातील लोक आम्हाला शिव्या देत आहेत अशी खंत महिला नगरसेवकांनी व्यक्त केली. शमीम अब्दुला आणि संजय पांपटवार यांच्यात शाब्दीक चकमक झाली. पाणी टंचाईवर विशेष सभा बोलवा असे संजय पांपटवार म्हणाले. सुग्रीव अंधारे यांच्या कामावर नगरसेवकांची भरपूर नाराजी दिसली. दलित वस्ती निधीतील कामामध्ये गडबड झाल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. १० लाखांची कामे लवकरच सुरू होतील असे जयश्री पावडे म्हणाल्या. या सर्व आरोपांमध्ये सर्वात जास्त आरोप कॉंगे्रस नगरसेवकांनी केले. वृत्तलिहिपर्यंत बैठक संपली होती की, नाही आणि अर्थसंकल्पाच्या विषयावर काय झाले याबद्दल माहिती मिळाली नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *