नांदेड(प्रतिनिधी)-देशासाठी धनुर्विद्येत ओलंपिक पदक मिळविण्यासाठी अर्जुनासारखे ध्येयवेडे व्हा म्हणजे यश नक्की मिळेल असे आवाहन मराठा सेवा संघाच्या दक्षिणच्या अध्यक्षा सौ .विद्याताई पाटील यांनी केले . त्या नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशन व आर्चरी स्कूल नांदेड च्या वतीने श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियम नांदेड येथे आयोजित तेराव्या जिल्हास्तर धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून . डॉ. रूपाली माने , क्रीडा अधिकारी किशोर पाठक ,संघटना सचिव वृषाली पाटील जोगदंड पालक प्रतिनिधी बालाजी चेरले यांची प्रमुख उपस्थिती होती. वसमत जिल्हा हिंगोली येथे आयोजित मिनी सब ज्युनिअर 14 वर्षाखालील व नऊ वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार्या नांदेडच्या संघाची निवड सदरील स्पर्धेतून होणार असून आपली उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचे आवाहन किशोर पाठक यांनी केले तर डॉक्टर डॉक्टर रूपाली माने म्हणाले की खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असून शारीरिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा भाग आहे त्यासाठी प्रत्येकाने खेळ खेळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.तर बालाजी चिरले यांनी खेळातील विविध संधीतून मिळणारे लाभ शिष्यवृत्ती नोकरीतील आरक्षणाचा टक्का यावर विश्लेषण केले . प्रास्ताविक वृषाली पाटील जोगदंड केले.सदर स्पर्धेसाठी नऊ व चौदा वर्षाखालील मुलांनी व मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला .आहे स्पर्धा संचालक म्हणून स्वप्नील सोनुने हे काम पाहत आहेत शहरासह किनवट लोहा मुखेड व इतर तालुक्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील सोनवणे यांनी केले तर स्पर्धा यशस्वीतेसाठी मालोजी कांबळे ,ज्ञानोबा नागरगोजे काजी मोहम्मद रफीकोदिन ,माणिक केंद्रे अमरनाथ मोरे , अजय जाधव ,ज्ञानेश्वर शेळके श्री सतीश मुधोळकर ,कल्याणी सूर्यवंशी आदी मेहनत घेत आहेत . सदर स्पर्धेत निवडले गेलेले संघ दिनांक 16 ते 18 मे दरम्यान वसमत हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेत नांदेड जिल्ह्यात तर्फे आपले कसब दाखविणार आहेत.
