अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेचे निवेदन
नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर येथील राम गोपाल गुप्ता औद्योगिक वसाहतीमध्ये किड्स किंगडम नावाची शाळा नियमबाह्यरितीने सुरू करण्यात आली असून संस्थेच्या उपविधीचे उल्लंघन करणारी ही टोलजंग इमारत आहे. याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी उपनिबंधक सहकारी संस्था यांना अर्ज लिहिला आहे. कायदेशीर कार्यवाही केली नाही तर दि.12 मे पासून उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा या निवेदनात दिला आहे. या निविदाची प्रत जिल्हाधिकारी नांदेड आणि पोलीस निरिक्षक शिवाजीनगर यांना सुध्दा देण्यात आल्या आहेत.
शिवाजीनगरमधील रामगोपाल गुप्ता औद्योगिक वसाहत ही शासनाची जागा आहे. या वसाहतीमध्ये मे.सुपर प्रोडेक्ट प्लॉट नं.126-सी हे भुखंड औद्योगिक वसाहतीमध्ये स्टील फर्निचर ऍन्ड फॅब्रिकेशन वर्क या व्यवसायासाठी घेतले आहे. पण तसे न करता या भुखंडावर किड्स किंगडम नावाची शाळा सुरू आहे. हा प्रकार संस्थेच्या उपविधी क्रमंाक 11(8) चे उल्लंघन करणारे असून त्यावर योग्य कायदेशीर कार्यवाही करावी. उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाचे आर्थिक व प्रेमापोटी जाणिवपुर्वक मे.सुपर प्रोडेक्टवर मेहरबानी दिसते आहे. स्टील फर्निचर आणि फेब्रीकेशन वर्क या व्यवसायासाठी भुखंड घेवून त्या ठिकाणी बेकायदेशीर पणे किड्स किंगडम नावाची शाळा सुरू आहे. आमच्या निवेदनावर कार्यवाही केली नाही तर 12 मे 2022 पासून उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
