8 मे रोजी पहाटे एका युवकाला लुटले होते
नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.8 मे रोजी पहाटे 4.30 वाजता एका 20 वर्षीय युवकाला लुटणाऱ्या अनुक्रमे 18 व 19 वर्षीय युवकांना भाग्यनगर पोलीसार्ंीनी पकडल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.पी.शिंदे यांनी या दोघांना पोलीस कोठडीत पाठविले आहे. या तीन एक शिक्षक पुत्र आणि एक श्रीमंतांचा मुलगा आहे.
निरेश महादेव दुर्गे हा गडचिरोली जिल्ह्यातील अल्लापल्ली या नक्षलग्रस्त भागातील युवक नांदेडला नीट परिक्षा तयारी करण्यासाठी राहत होता. काल दि.8 मे रोजी त्याला गावाकडे जायचे होते. म्हणून तो भाग्यनगर रस्त्यावर पहाटे 4.30 वाजता ऍटोची वाट पाहत असतांना एका दुचाकीवर दोन जण आले आणि त्यांनी त्याला कुठे जायचे आहे आम्ही तुला सोडतो असे सांगीतले. आमची मदत हवी असेल तर तुला 100 रुपये द्यावे लागतील असेही सांगितले. निरेश दुर्गे तयार झाला. त्या दोघांनी त्याला दुचाकीवर बसवून कैलाश नगर भागात नेले आणि निरेश दुर्गेचे डोके फोडले. जिगरबाज निरेशने एकाला पकडून ठेवले. त्याचा 5 हजारांचा मोबाईल आणि 1750 रुपये रोख रक्कम अशी 6 हजार 750 रुपयांची लुट झाली होती.
पोलीस यावेळी उशीरा पोहचले या संदर्भाने अनेक विद्वानांनी पोलीसांना ट्रोल केले. पण भाग्यनगर पोलीसांनी कांही तासांतच दुसरा आरोपी पकडला. यात सुमित माधव एडके हा 18 वर्षीय युवक शिक्षक (गुरूजी) पुत्र आहे. ज्या शिक्षकाने समाज घडविला त्यांना आपलाच सुपूत्र घडविता आला नाही असेच म्हणावे लागेल. दुसरा युवक दिपक गणेश नारगुडे वय 19 हा एक श्रीमंत पुत्र आहे. त्याच्या वडीलांची तर काल 8 मे रोजी शस्त्रक्रिया होणार होती आणि त्याने निरेश दुर्गेला लुटून “प्रताप’ घडवला. या प्रकरणी दाखल झालेला गुन्हा क्रमांक 162/2022 कलम 394, 34 चा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक भारती वाठोरे यांच्याकडे देण्यात आला. आज भारती वाठोरे आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी सुमित एडके आणि दिपक नारगुडेला न्यायालयात हजर केल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.पी.शिंदे यांनी या दोघांना एक दिवस पोलीस कोठडी पाठविले आहे.
पोलीस उशीरा आले याचा ट्रोल करणाऱ्यांनी आता या युवकांचा पण ट्रोल करायला हवा. कारण त्यांनी लुटलेल्या ऐवजाची किंमत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी कवडीमोल आहे. संभ्रांत शिक्षक आणि श्रीमंत व्यक्तीचा पुत्र असे करू शकतात अशा वेळी पोलीसांना ट्रोल करून काय होणार. या संदर्भाने सुध्दा जनजागृती करण्याची तयारी त्या सर्व विद्वानांनी करायला हवी ज्यांनी काल पोलीसांना ट्रोल केले होते.
संबंधीत बातमी..
पहाटे दरोडा टाकणारे दरोडेखोर एक शिक्षक पुत्र आणि एक गडगंज श्रीमंत