नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील कवठावाडी गावात एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. या प्रकरणात फिर्यादीने आरोपीचे नाव नमुद केले आहे. कारेगाव ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजारांचा ऐवज चोरला आहे. बारड येथे 24 हजार 999 रुपयांचा मोबाईल चोरीला गेला आहे. धर्माबाद ते बाळापूर प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून 74 हजार रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरीला गेले आहेत. देगलूर शेत शिवारातून 4 हजार 600 रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे.
संभाजी गोविंदराव पवळे रा.कवठावाडी ता.कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 मे च्या रात्री 10 ते 8 मे च्या पहाटे 3 वाजेदरम्यान गावातील व्यंकटी पांडूरंग पवळे याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 80 हजार रुपये रोख रक्कम आणि 80 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिणे असा 1 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक इंद्राळे अधिक तपास करीत आहेत.
हरीदास विठ्ठलराव मोरे रा.कारेगाव ता.लोहा यांचे घर कोणी तरी चोरट्यांनी 7 मेच्या रात्री 9 ते 8 मेच्या सकाळी 6 वाजेदरम्यान फोडले आहे. त्यातून 74 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरीला गेले आहेत. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार डफडे हे करीत आहेत.
बारड येथे पत्रकार अमोल गंगाधर टेकले हे आठवडी बाजारात दि.7 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास खरेदी करत असतांना त्यंाच्या खिशातील 24 हजार 999 रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. बारड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कारंजकर अधिक तपास करीत आहेत.
धर्माबाद ते बाळापूर असा ऍटोमध्ये दि.8 मे रोजी मिना राजू भद्रे या महिला प्रवास करत असतांना त्यांच्या पर्समधील 74 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे साहित्य कोणी तरी चोरले आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार स्वामी अधिक तपास करीत आहेत.
देगलूर शिवारातील गट क्रमांक 647 मध्ये शेत तळयावर लावलेल्या तीन अश्वशक्ती क्षमतेची मोटार, त्यास लागणारे इतर साहित्य असा 6 हजार 400 रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कांबळे हे करीत आहेत.
