ताज्या बातम्या नांदेड

​ वन्यजीव प्रेमींतर्फे शहरात प्राणी व पक्ष्यांसाठी​​ कृत्रिम पाणवठे 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात सध्या उन्हाचा पारा 44°c  पर्यंत येऊन ठेपला आहे .माणसांप्रमाणे प्राणी पक्षी ही पाण्याच्या शोधात वनवन भटकताना दिसत आहेत . निर्जलीकरण व उष्माघाताने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत.
प्राण्यांना व पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी या माणुसकीच्या नात्याने शहरातील प्राणीप्रेमी वन्यजीव प्रेमी संघटना वाईल्डलाइफ रेस्क्यु अँड कंसरवेशन सोसायटी व वन विभाग नांदेड मार्फत शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे बसवण्यात येत आहेत.
नांदेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री .संदीप शिंदे व WRCS
या वन्यजीव प्रेमी संघटने च्या पुढाकाराने शहरात जेथे पक्ष्यांचा जास्त आढळ आहे अशा
ठिकाणी झाडांवर मातीची कृत्रिम पाणवठे व जमिनीत पाणवठे निर्माण करण्यात येत आहेत.
शहरातील अनेक भागात हे कृत्रिम पाणवठे तयार करून बसवण्यात आलेले आहेत.
यात वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री .वाबळे यांच्या मार्गदर्शना खाली मानद वन्यजीव रक्षक अतींद्र कट्टी WRCS चे प्राणीमित्र शिवम आर्य ,गणेश भोसले ,अंबिका उदावंत यांनी अनेक ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत .
तरीही WRCS नांदेड चे वन्यजीव अभ्यासक शिवम आर्य यांनी आवाहन केले आहे कि शहरात सर्वांनी किमान मिळेल त्या जागेवर पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी .
अथवा WRCS संस्थेच्या हेल्पलाइन नंबर 8668879912 यावर संपर्क साधावा तेथे विनामूल्य पाणवठे तयार करून देण्यात येतील .
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *