नांदेड,(प्रतिनिधी)- गोदावरी काठी डंकिन जवळ असणाऱ्या सैलानी बाबा दर्गाह येथे सेवा देणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीला शब्बरचा मोठं बंधू आणि इतर तीन अनोळखी माणसांनी वस्तरा,दात असलेला चाकू या शस्त्रांचा वापर करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार ४ मे रोजी सांयकाळी घडला आहे.आज ५ मे रोजी वजिराबाद पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गंगाचाळ येथील रघुनाथ उर्फ रघु बाबा घनश्याम वाघमारे (५०) यांनी आज ५ मी रोजी सरकारी रुग्णालयात उपचार घेतांना दिलेल्या तक्रारीनुसार ते डंकिन परिसरात असलेल्या सैलानी बाबा दर्गाह येथे सेवा करतात आणि तेथेच राहतात.दिनांक ४ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास चार जण तेथे आले तेव्हा मी ओटा धूत होतो.त्यातील एकाने आपले नाव मी शबरचा मोठं भाऊ कलंदर आहे असे सांगून मला वस्तरा वापरत मारहाण केली.इतर तिघांनी सुद्धा त्यांच्या कडील दात असलेल्या चौकूने मला मारहाण केली.मला खातंच करून टाकू असे ते तिघे बोलत होते. मी त्यांना सांगितले की शबरचे माझे आपसात संबंध छान आहेत.तेव्हा त्यांनी मला अजूनच मारहाण केली.त्या चार जणांनी केलेल्या मारहाणीत मला कपाळावर,दंडावर,पोटावर,अनेक वार करून मला जखमी केले आहे. मला येथून निघून जा असे ते चार जण सांगत होते.तेव्हा मला मारहाण करणारा शबरचा मोठा भाऊ कलंदर आणि इतर तीन अनोळखी लोकांवर कायदेशीर कार्यवाही करावी.या तक्रारीतील शबर हे नाव गुन्हेगारीत नामांकित नाव आहे.
वजिराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक गोविंद जाधव यांनी जखमी रघुनाथ उर्फ रघु बाबा यांचा जबाब घेतल्यानंतर कलंदरसह चार जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६,५०४,५०६ आणि ३४ नुसार गुन्हा क्रमांक १५०/२०२२ दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे यांच्याकडे देण्यात आला आहे.