नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभर भोंग्यांचा वाद सुरू आहे. या पार्श्र्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत कायद्या व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडायला नको याची दक्षता पोलीस विभाग घेत आहे. अशाच एका प्रयत्नातून पोलीसांनी विविध ठिकाणी बैठका घेवून त्याबाबत माहिती प्रसारीत केली आणि त्यानुसार धार्मिक स्थळातील व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वागण्याचे आश्वासन दिले आहे. आज दि.5 मे रोजी अनेक धार्मिक स्थळांवर सकाळी 5 वाजता सुरू होणारे भोंगे बंद होते.
राज्यात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा वाद पेटलेला आहे. पण या वादातून इतर कोणताही रंग त्या वादाला येणार नाही याची दक्षता घेण्यात राज्यातील पोलीस प्रशासन मेहन घेत होते. नांदेड जिल्ह्यात सुध्दा अनेक ठिकाणी पोलीस विभागाने आयोजित केलेल्या बैठकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कोणतेही भोंगे वाजणार नाहीत. याची दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले.
काल दि.4 मे रोजी पोलीस ठाणे इतवाराच्या हद्दीत पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी वेगवेगळ्या धार्मिक स्थळांच्या विश्र्वस्त मंडळातील लोकांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही रात्री 10 ते पहाटे 8 वाजेपर्यंत भोंगे वाजविणार नाहीत असे आश्र्वसन सर्वच धार्मिक मंडळींनी दिले. त्यानुसार आज दि.5 मे रोजी पहाटे 5 वाजता कोणताही भोंगा वाजला नाही त्यावरुन धार्मिक स्थळातील लोकांनी या आपल्या आश्र्वसनाला पाळल्याचे चित्र दिसले.
