

नांदेड,(प्रतिनिधी)- राष्ट्रीय देहांगदान संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष यांनी देहदानाविषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ मे २०२२ रोजी एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.
राष्ट्रीय देहांगदान संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष माधवराव अटकोरे यांनी ४ मे रोजी दिलेल्या निवेदनात काही मुद्द्यांवर शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी १७ मे २०२२ रोजी एक दिवशीय उपोषणाचा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.त्यात बेवारस आणि अपघाती मृतदेह थेट शासकीय रुग्णालयांना सुपूर्द करावे.मृतदेहाचे दहन लाकडाऐवजी पांढऱ्या कोलच्या साहायाने करावे.प्रत्येक स्मशान भूमीत अवयवदानाचे बोर्ड लावावेत.प्रत्येक रुग्णालयात त्वचा पेठी सुरु करावी. प्रत्येक खाजगी आणि सरकारी रुग्णालयात अवयवदानाची माहिती देणारा कक्ष सुरु करावा.प्रत्येक मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयात अवयवदाते आणि गरजू रुग्ण यांची माहिती देणारा फलक सुरु करावा.प्रत्येक ग्रामसभेत अवयवदानची प्रतिज्ञा बंधनकारक करावी.ग्रामसभा,वाचनालय,शाळा, अंगणवाडी, पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र,समाज मंदिर आदी ठिकाणी अवयवदानाची माहिती देणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे. वाहन चालक परवाना देतांना अवयवदानाचा संकल्प बंधनकारक करावा.अवयवदात्यांचा उचित सन्मान करावा.अश्या मुद्द्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माधवराव अटकोरे हे १७ मे २०२२ रोजी एक दिवशीय उपोषण करणार आहेत.