अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांचे आदेश
नांदेड,(हिंगोली) – लॉक डाउन काळात पत्रकार कन्हैया खंडेलवालवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा असा गुन्हा त्यांच्या विरुद्ध दाखल करणाऱ्या तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आणि आज मुंबईमध्ये पोलीस निरीक्षक असलेल्या ओमकांत चिंचोळकरची आणि चार वाहतूक पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिँह यांनी दिले आहेत.आता मुंबईच्या पोलीस निरीक्षकाची विभागीय चौकशी हिंगोली ग्रामीण पोलीस उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक करतील आणि अंतिम आदेश अपर पोलीस महासंचालक करतील असे हे आदेश आहेत.
लॉक डाउन काळात हिंगोली शहरात वाहतूक शाखेत ओमकांत आनंदराव चिंचोळकर हे सद्गृहस्थ सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते.तेव्हा काही वेळ जनतेला आपल्या आवश्यकतेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दिला जात असे. अश्याच एका दिवशी पत्रकार कन्हैया खंडेलवाल जनतेच्या पळापळीचे चित्रीकरण करीत असतांना सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर आणि त्यांचे सहकारी पोलीस मारहाण करीत असल्याची माहिती समजल्यावर तिकडे गेले आणि चित्रीकरण करू लागले.अत्यंत सफाईदार पणे आपली मारहाण लपवली जावी या हेतूने चिंचोळकर यांनी पत्रकार कन्हैया खंडेलवाल सोबत साधलेला संवाद आपल्या पोलीस अंमलदारांना चित्रीकरण करायला लावला.नंतर त्यांना गाडीत कोंबून वाहतूक पोलीस विभागात नेले.तेथे काय काय झाले याबद्दल न लिहिलेलेच बरे,पण म्हणतात ना पोलीस खाते करील तेच होईल आणि झाले असेच पत्रकार कन्हैया खंडेलवालवरसरकारी कामात अरथळा या सदरात गुन्हा दाखल झाला.खंडेलवालचा मोबाईल कोणी घेतला याचा शोध अद्याप लागला नाही. पण त्या मोबाईलमधील काही ऑडिओ बदल करून काही चमच्यांनी खंडेलवालची बदनामी फेसबुकवर केली.पण खंडेलवाल लढत राहिले.आपली बाजू मांडताना ‘सुख के सब साथी .. ; या गाण्याचा अनुभव त्यांनी घेतला.मी चुकलोच नाही तर भीती कश्याची असा विश्वास बाळगून अनेक अर्ज केले आणि अखेर त्यांना यश आले आहे.
प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ओमकांत आनंदराव चिंचोळकर (तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा हिंगोली) आणी आता पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्तालय मुंबई,सोबत पोलीस अंमलदार आनंद मस्के (ब.न. ३५०) नेमणूक पोलीस नियंत्रण कक्ष हिंगोली,गजानन राठोड (ब.न. ८२८),अमित मोडक (ब.न. ८८),चंद्रशेखर काशिदे (ब.न. ६०) सर्व नेमणूक वाहतूक शाखा हिंगोली याची विभागीय चौकशी करण्या इतपत माझी सक्षम अधिकारी खात्री झाली आहे.त्यासाठी हिंगोली ग्रामीण पोलीस उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २५ नुसार ओमकांत चिंचोळकर आणि चार पोलीस अंमलदाराच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक यांनी पाठवलेल्या पत्राचा उल्लेख या विभागीय चौकशीसाठी जोडण्यात आला आहे.विभागीय चौकशीचे आदेश हिंगोली ग्रामीण उप विभागातील पोलीस उप अधीक्षकांनी संबंधित कसूरदारांना कळवायचे आहेत.
विभागीय चौकशी शासन परिपत्रक गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग परिपत्रकाच्या आधीं राहून लवकरात लवकर पूर्ण करून आपल्या सविस्तर अहवालासह अंतिम आदेशाची अपर पोलीस महासंचालक कार्यालयास पाठवायचे आहे.विभागीय चौकशीचा अंतिम आदेश मुंबई येथून होणार आहे. चौकशी पूर्ण झाली नाही तर विहित वेळे नंतर मुदतवाढ प्रस्ताव पाठवायचा आहे.
…. आता न्यायाच्या मार्गावर – खंडेलवाल
आज पर्यंत मी कसा बरोबर आहे हे मांडण्यात माझी भरपूर पायपीट झाली आहे.पण आता अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने दिलेले चौकशी आदेश म्हणजे माझी न्यायाची मागणी आतायोग्य मार्गावर पुढे जाणार आहे असे मत पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांनी वास्तव न्यूज लाईव्ह सोबत बोलताना सांगितले.