ताज्या बातम्या नांदेड

महाराष्ट्राने दिलेली समता आणि बंधुभावाची परंपरा टिकवण्यासाठी आपली मेहनत महत्वपुर्ण-पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्राची परंपरा, एकता आणि बंधुभावाचे शिक्षण देशाला देते पण हा बंधुभाव आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी आम्हा सर्वांना मेहनत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.


आज 62 व्या महाराष्ट्र वर्धापन दिनी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर आयोजित शासकीय समारंभात पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, केंद्रीय सुरक्षा बल मुदखेडचे समादेशक लिलाधर महारानीया, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांची उपस्थिती होती.


सर्वप्रथम ध्वजारोहण झाले. गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप आणि राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलीस दलाच्या, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या, होमगार्ड आदींच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कवायतीचे निरिक्षण केले. त्यानंतर सर्व पथकांनी कवायतीद्वारे उपस्थितांना मानवंदना दिली. त्यानंतर लहान बालकांनी आणि बालिकांनी आप-आपल्या भागातील सांस्कृतिक परंपरांचे प्रदर्शन केले. सर्वात आकर्षक बाब ही होती की, पोलीस दलातील श्वानाने उपस्थितांना मानवंदना दिली. या कार्यक्रमात आ.बालाजी कल्याणकर, आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, महापौर जयश्री पावडे यांच्यासह असंख्य नेते, पालक, शिक्षक, शिक्षिका अणि बालक-बालिका उपस्थित होत्या.
याप्रसंगी पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या स्थापनेला आज 62 वर्ष झाली आहेत. त्या निमित्त आज असणाऱ्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मी सर्वांना शुभकामना देत आहे. महाराष्ट्राला वैचारिकता, समता आणि बंधुभावाचा वारसा लाभलेला आहे. हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आम्हास प्रयत्न करावे लागतील. मागील हजारो वर्षांच्या ईतिहासात महाराष्ट्राच्या भुमिने देशावर आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील संत,महात्म्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेचे मार्गदर्शन केले. त्यामुळेच महाराष्ट्र ताकतीने उभा आहे. उन, पाऊस,वारा यांच्या त्रासात सुध्दा पंढरीच्या दर्शनाला वारकरी जातात हा वारसा आता जगात प्रसिध्द झाला. शेकडो वर्षापासून प्राप्त झालेल्या महाराष्ट्राच्या या परंपरेला कायम टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशात किंबहुना जगात एकता आणि बंधुभाव टिकवून ठेवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत.जिल्हा परिषदेच्या स्थापनेला आजपासून 61 वे वर्ष सुरू झाले.

महानगरपालिका सुध्दा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. लोक सहभागातून लोकांसाठी विकासाची कामे करणे हा मुळ हेतू घेवूनच आपण सर्व काम करत आहोत. नांदेड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी विकास कामांची जी प्रगती या 60 वर्षात दाखवली ती प्रगती अतुलनिय आहे. नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांना समृधी महामार्गाने जोडून मोठ्या सुविधा झाल्या आहेत. 14 हजार कोटी रुपयांचा हा प्रगल्प इतर उद्योगांना सुध्दा मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे. समृध्दी महामार्गामुळे नांदेड ते औरंगाबाद आणि पुढे पुण्याला जाण्यासाठी द्रुतगती मार्ग तयार होत आहे. या कामात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सर्वात जास्त मेहनत आहे. नांदेड आणि लातूर जलद रेल्वेने जोडणे हे सुध्दा तेवढेच महत्वपूर्ण आहे. त्यामुळे नांदेड पुणे हा मार्ग कमी वेळेत जाता येईल. नांदेड राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र झाले आहे. त्यासाठी नवीन महाविद्यालय, नवीन वस्तीगृहे या प्रकल्पावर सुध्दा काम सुरू आहे. विकास हा सर्व जातीविषयक आणि सर्व समावेशक असला पाहिजे असा प्रयत्न करून तो विकास साधण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.


या कार्यक्रमातनंतर पोलीस महासंचालकांनी नांदेड जिल्ह्यातील 11 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले. त्या सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस अंमलदार दिनेश रामेश्र्वर पांडे, दत्ता रामचंद्र सोनुले, समीर खान मुनीर खान पठाण, शेख चॉंद शेख अलीसाब, संभाजी सुर्यकांत गुटे, गंगाराम हनुमंतराव जाधव, राजेंद्र राजलिंग सिटीकर, शिवहर शेषराव किडे, दिपक रघुनाथ ओढणे, दिपक दादाराव डिकळे आणि दिपक राजाराम पवार यांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सन्मान केला. यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटून त्यांना शुभकामना दिल्या आणि आजच्या 62 व्या महाराष्ट्र स्थापना दिवसाची सांगता झाली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *