नांदेड(प्रतिनिधी)-पहिल्या खेलो इंडिया धनुर्विद्या पश्चिम विभागीय कंपाउंड व रिकर्व्ह स्पर्धेचे आयोजन दि.1 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे भारतीय खेल प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले असून त्यात नांदेडचे सात स्पर्धक आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
भारतीय खेल प्राधिकरणाच्यावतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रासह , गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, दिवदमन, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी, आंध्र प्रदेश या राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात नांदेडचे कुमारी आराधना चन्नावार सार्थ पांढरे , मंगेश केंद्रे , पृथ्वीराज कदम ,अमरनाथ मोरे , आर्यन पुजरवाड हे सर्व रिकर्व्ह प्रकारात आपले कौशल्य पणाला लावणार आहेत तर आकाश गायकवाड , अथर्व जोंधळे हे कंपाउंड प्रकारात आपले कसब पणाला लावणार आहेत.
स्वप्नील सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील संघ सहभागी होत आहे. सदरील स्पर्धेसाठी पंधरा आंतरराष्ट्रीय खेळाडूही आपले कौशल्य दाखविणार असून त्यांच्या निवडीचे सचिव वृषाली पाटील जोगदंड यांनी अभिनंदन केले आहे.या स्पर्धा यशस्वीतेसाठी भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संचालिका सुस्मिता जोशी, संचालक नितीन जयस्वाल, सहाय्यक संचालक श्रीनिवास माळेकर, तेजश्री चाठे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून तांत्रिक सहकार्य औरंगाबाद धनुर्विद्या संघटनेच्यावतीने लक्ष्मीकांत खीची, विठ्ठल नरके, पंकज खीची, विशाल वाघचौरे हे मेहनत घेत आहेत.
नांदेडच्या खेळाडूंचे त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, किशोर पाठक, रमेश चवरे, जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष रमेश पारे, बालाजी पाटील जोगदंड, जयपाल रेड्डी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपीले, राहुल वाघमारे , अभिजीत कदम कोंडेकर, डॉ. हंसराज वैद्य, प्राचार्य मनोहर सुर्यवंशी , बाबू गंदपवाड ,रमेश नांदेडकर, सुरेश पांढरे शिवाजी केंद्रे, प्रवीण कुपटीकर, मालोजी कांबळे गंगालाल यादव , प्रकाश जाधव , अशोक मोरे , संजय चव्हाण, यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
