नांदेड(प्रतिनिधी)-मौजे जांभळा ता.हदगाव या शिवारात शेतावर कब्जा करतांना 11 जणांनी जीव घेणा हल्ला करून कांही जणांना गंभीर जखमी केले. मनाठा पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
बाबुराव माणिकराव शेटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 एप्रिलरोजी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत जांभळा शिवारातील शेत गट क्रमांक 126, 127 मध्ये बळजबरी ताबा घेतांना धनराज बाबूराव सोनटक्के (28), गजानन डाखोरे (24), माधव पुजाजी डोखोरे(28), कोंडबा मारोती डाखोरे (25) गिरजाबाई पुरभाजी तरंगे (57), लक्ष्मीबाई कोंडीबा डाखोरे (48), रामकोरबाई बाबुराव सोनटक्के (48), पुरभाजी राघोजी तरंगे (62), शिवराज बाबूराव सोनटक्के (22), पुजाजी मारोती डाखोरे (58) यातील कांही जण चिकाळा ता.हदगाव आणि कांही रा.जांभळा ता.हदगाव यांच्यासह इतर तीन जण त्यावेळी होती. या हल्लेखोरांनी शेताचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतांना तेथे ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला व बाबुराव शेट्टे यांच्यासह इतर कांही जणांना मारुन जखमी केले.
याप्रकरणी मनाठा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 83/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची बरीच कलमे जोडली आहेत. पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात मनाठ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
