ताज्या बातम्या नांदेड

पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी झाली. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुष्पअर्पण करून आपले श्रध्दासुमन सुध्दा अर्पण करण्यात आले.
आज 30 एप्रिल 2022 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक अश्र्विनी जगताप, ईतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, अनेक शाखांचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस निरिक्षक उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, विनोद भंडारे यांनी उत्तम रित्या केले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *