नांदेड,(प्रतिनिधी)- अप्रतिम मीडिया द्वारे महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना विविध गटांमध्ये पत्रकारांना चौथा स्तंभ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. प्रत्येक गटात प्रथम द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार दिले जातात .चौथा स्तंभ पुरस्कार 2022 साठी स्थानिक विकास वृत्त या गटातून प्रथम पुरस्कार एनडीटीव्ही प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल यांना जाहीर करण्यात आला आहे.
चौथा स्तंभ पुरस्काराचे वितरण मुंबई येथील समारंभात मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
अशी माहिती अप्रतिम मीडिया चे संचालक डॉ अनिल फळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कन्हैया खंडेलवाल यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा पु.ल.देशपांडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सह अनेक पूरस्कार मिळालेले आहे.