नांदेड(प्रतिनिधी)-दारु देत नाही म्हणून एका 56 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना कोपरा शिवार ता.हदगाव येथे घडली आहे. तामसा पोलीसांनी याप्रकरणी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
राजपाल विश्र्वनाथ घुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 एप्रिलच्या सायंकाळी 5.30 ते 5.45 या वेळेदरम्यान कोपरा शिवारातील त्यांच्या शेतात गोविंद राघोजी डोणेराव आणि राजरत्न साहेबराव जाधव यांच्यासह दोन अनोळी व्यक्ती अशा 4 जणांनी मिळून गंगाधर विश्र्वनाथ घुले यांना तु दारु आम्हाला का देतनाहीस अशी विचारणा करून त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. इतर दोघांनी लाकडाच्या सहाय्याने त्यांना मारहाण केली. तामसा पोलीसांनी याप्रकरणी गोविंद राघोजी डोणेवाड, राजरत्न साहेबराव जाधव यांच्यासह दोन अनोळीखी अशा 4 जणांविरुध्द गंगाधर घुले यांचा खून करण्याच्या कारणावरून गुन्हा क्रमांक 44/2022 दाखल केला आहे. पुढील तपास तामसाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उजगरे हे करीत आहेत.
