क्राईम ताज्या बातम्या

तुप्पा येथे झाला गोळीबार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस अवैध शस्त्र पकडण्यात भरपूर मेहनत घेत असतांना आज 30 एप्रिलरोजी दुपारी जवाहरनगर तुप्पा येथे गोळीबार झाला. गोळीचा नेम चुकला तेंव्हा गोळी मारणाऱ्याने तलवारीच्या सहाय्याने एकाला जखमी करून पळ काढला आहे.
नांदेड शहरात व जिल्ह्यात अवैध बंदुका, तलवारी, खंजीर जप्त करून गुन्हेगारांवर जरब आणण्यासाठी मेहनत घेतली. पण आज पुन्हा एकदा गोळीबार झालाच. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी जवाहरनगर तुप्पा भागात दिलीप पुंडलिकराव डाखोरे रा.शंभरगाव ता.लोहा याने पिंटु कसबे या युवकावर शुल्लक कारणावरुन गावठी बंदुकीतून गोळी झाडली. परंतू डाखोरेचा नेम चुकला आणि गोळी पिंटुला लागली नाही. तेंव्हा डाखोरेने तलवारीच्या सहाय्याने पिंटु कसबेच्या पायावर मारून जखमी केले आणि तो पळून गेला. याबाबत असे सांगण्यात आले की, दिलीप डाखोरे हा बिघाणीया गॅंगचा एक सदस्य आहे. गोळीचा नेम चुकला तरी त्याने तलवारीच्या सहाय्याने युवकाला जखमी केले. याचा अर्थ त्याच्याकडे दोन अवैध हत्यारे होती हे निश्चित झाले. घटनेची माहिती मिळताच ईतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, गुन्हेगारांवर गोळीबार करण्यात नामवंत असलेले गुन्हेगारांचे कर्दनकाळ पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब हे सुध्दा त्या ठिकाणी पोहचले. पण डाखोरे त्यांना सापडलेला नाही. गोळीबार करण्याची पध्दत अद्याप बंद झाली नाही हे मात्र तेवढेच खरे आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *