नांदेड(प्रतिनिधी)-एक पोलीस निरिक्षक, दोन पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि दोन पोलीस अंमलदारांना आज पोलीस दलातून सेवानिवृत्तीनंतर समारंभपूर्वक निरोप देतांना पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी त्यांना भविष्यातील जीवनासाठी शुभकामना प्रेषित केल्या.
आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत पोलीस निरिक्षक मधुसुदन देविदास अंकुशे, माहूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल लालु जाधव, वाचक शाखा पोलीस अधिक्षक कार्यालय येथील पोलीस उपनिरिक्षक मिर्झा अनवर बेग ईब्राहिम बेग, जीपीयु शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक देविदास समाधान राठोड, पोलीस मुख्यालयातील मारोती बाबाराव कपाळे, बालाजी मनोहर पवार, पोलीस ठाणे उस्माननगर येथील उत्तम हरी राठोड, जिल्हा विशेष शाखेतील बालाजी गंगाराम श्रीरामे, पोलीस मुख्यालयातील शिवाजी किशनराव हंबर्डेे असे 9 पोलीस अधिकारी व अंमलदार आज सेवानिवृत्त झाले.
या प्रसंगी सर्व सत्कारमुर्तींना त्यांच्या कुटूंबासह पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांनी सन्मान करून त्यांना निरोप दिला. भविष्यातील जीवन आरोग्य दायक राहावे अशा शुभकामना प्रमोद शेवाळे यांनी सर्वांना दिल्या.
याप्रसंगी पोलीस कल्याण विभागातील पोलीस निरिक्षक अनंत नरुटे, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्वच शाखांमधील अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस अंमलदार रुपा कानगुले यांनी केले. तर आभार व्यक्त करण्याची जबाबदारी शिवाजी लष्करे यांनी पार पाडली.
